प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमाचं करावा रद्द; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केले विधान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात मोठे बदल करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग पालन करण्यात येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बेरीक जॉन्सन यांनी भारताचा नियोजित दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये वाढत्या कोरोना स्ट्रेन मुळे त्यांनी असे केल्याचे सांगण्यात येत आहे. बेरीक जॉन्सन यांना कार्यक्रमाला बोलवण्यात आले होते.

पण कोरोनाच्या साथीमुळे त्यांनी येण्यास नकार दिला. याचवेळी काँग्रेसच्या एका नेत्याने प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच का रद्द करू नये यासाठी सरकारकडे कारण मागितले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी कार्यक्रमाला पाहुणे नाही तर कार्यक्रम रद्द कर करण्यात येऊ नये? असा प्रश्न विचारला आहे.

आपल्याकडे कार्यक्रमाला पाहुणे नाहीत म्हटल्यावर कार्यक्रमाचं का रद्द करण्यात येऊ नये यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले आहेत. प्रजासत्ताक दिनाला परेड पाहण्यासाठी गर्दी झाली तर तो एक बेजबाबदार पणा राहील असाही शशी थरूर पुढे सांगतात. बेरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांना कॉल करून सोहळ्याला न येण्याबाबत कळवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!