अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा सर्वानाच अनुभवण्यास मिळत आहे. याचा रब्बीतील पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.
कांदा, गहू, हरभरा, मका, द्राक्षे व डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले असतानाच छोटे-मोठे उद्योग करुन उदरनिर्वाह करणार्या व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे.
सर्वात जास्त वीटभट्टी चालकांना बसला आहे. या आस्मानी संकटामुळे संगमनेर तालुक्यात वीटभट्टी चालकांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोना संकटामुळे कर्ज अथवा हातउसणे करुन संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यवसायासाठी भांडवल उभे केले.
यातून सावरतो ना सावरतो तोच निसर्गाने ‘पुन्हा’ एकदा झटका दिला. गुरुवारी व शुक्रवारी अवकाळीने बरसात केल्याने वीटभट्ट्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
तयार केलेल्या कच्च्या विटा आणि पक्क्या विटाही पाण्यात गेल्या आहेत. यामुळे वीटभट्टी चालक खचले असून, शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved