हृतिकचा पहिला चित्रपट ‘हा’ आहे; त्याबद्दल घ्या अधिक जाणून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-आज हृतिक रोशन याचा वाढदिवस आहे. तो चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा आहे. आपल्या शरीरयष्टी व डान्स साठी हृतिक रोशन फेमस आहे .

त्याने कहो ना प्यार हे, क्रिश,बँग बँग सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हृतिक रोशनचे वडील खूप मोठे दिग्दर्शक असल्याचे सांगण्यात येत.

त्याचे वडील राकेश रोशन यांचे बॉलिवूड मध्ये खूप मोठे नाव आहे. तुम्हाला वाटेल कि कहो ना प्यार हे हा हृतिक चा पहिला चित्रपट नव्हता,

त्याने त्याआधी एक चित्रपटामध्ये काम केले होते. त्या चित्रपटासाठी त्याला अवॉर्ड्स सुद्धा भेटलेले आहेत आणि त्याची खूप चर्चा सुद्धा या चित्रपटामुळे झाली.

हृतिक रोशनची बायको सुझान रोशन ही आहे.ती एक उत्तम इंटेरिअर डिझाइनर पण आहे. हृतिक ने लहानपणी १९८६ साली ‘भगवान दाद ‘ या चित्रपटामध्ये काम केले होते. या मध्ये राकेश रोशन,

श्री देवी आणि रजनीकांत यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाच्या वेळेस हृतिक अवघा १२ वर्षाचा होता. या चित्रपटामधील गाण्यात त्याने उत्कृष्ट डान्स करून सगळ्यांची मन जिंकली होती.हृतिक एक उत्तम डान्सर पण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe