टाटा बनणार भारतातील सर्वात मोठे उद्योजक; घडणार असे काही की

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- देशातील मोठ्या उद्योगांमध्ये सध्या स्पर्धा चालू आहे. त्यांच्यात भांडवली संघर्ष चालू आहे.टाटा आणि रिलायन्स यांच्यातील शेअर बाजारातील अंतर कमी होऊ राहिले आहे.

टाटा यांनी दूरदृष्टी दाखवून आयटी क्षेत्रातील कंपनी स्थापन केली.त्यांनी स्थापन केलेली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीला मागे टाकणार आहे.

पुढील काही काळ हा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा असणार आहे.या गोष्टीचा अंदाज टाटा यांना काही वर्षांपूर्वीच लागला होता. त्यानंतर मग त्यांनी टीसीएस ग्रुपची स्थापना केली.

टाटा समूहाच्या महसुलात सगळ्यात जास्त वाट टीसीएस समूहाचा आहे. आता टीसीएस समूहाचे भाग भांडवल पण वाढत आहे. त्यामुळे ती कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीला मागे टाकण्याची शक्यता आहे.

सध्याच्या घडीला दोन्ही कंपन्यांच्या बाजार मूल्यात फार कमी तफावत दिसून येत आहे.कोरोना संकटात माहिती तंत्रज्ञान विभागाचा बोलबाला राहिला आहे.

मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स घसरताना दिसून आले आहेत.जिकडे रिलायन्स कंपनीचे बाजार मूल्य घसरत होते तिकडे टीसीएस कंपनीचे मात्र वाढताना दिसत होते. लवकरच टीसीएस देशातील नंबर एकचि कंपनी झाली तर नवल वाटायला नको.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment