महत्वाचे ! व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन नियमावलीने झालेय ‘असे’ काही ; वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने आपले प्रायव्हसी पॉलिसी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन नियम व अटींमुळे आता वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप सोडण्याचा विचार करीत आहेत.

वापरकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि ते आता व्हॉट्सअ‍ॅपच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. हेच कारण आहे की व्हॉट्सअ‍ॅपसाठी असणारे ऑप्शन टेलिग्राम आणि सिग्नल हे युजर्स पसंत करू लागले आहेत. अलीकडील काही दिवसांमध्ये या मेसेजिंग अ‍ॅपवर युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. आता ते सिग्नल आणि टेलिग्राम सारखे अ‍ॅप्स डाउनलोड करीत आहेत.

टेलीग्रामचे संस्थापक म्हणाले की यूजर्सचा आदर करा :- दरम्यान, टेलीग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांनी शनिवारी सोशल मीडिया दिग्गज फेसबुकला फटकारले. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की बर्‍याच वर्षांपासून चालणाऱ्या टेलिग्रामवर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची तेजी पाहणे यात नवल नाही.

दुरोव म्हणाले, टेलिग्रामवरील वापरकर्त्यांची संख्या कशी वाढत आहे याकडे फेसबुकची संपूर्ण टीम लक्ष देऊन आहे. ते म्हणाले की यूजर्सचा आदर केला पाहिजे. टेलिग्रामवरील जवळपास 500 मिलियन यूजर्सची वाढ ही फेसबुकसाठी एक मोठी समस्या बनली आहे. केवळ टेलिग्रामच नव्हे तर मेसेजिंग अ‍ॅप सिग्नलवरही यूजर्सची संख्या सतत वाढत आहे.

 सिग्नल अ‍ॅप सर्व्हर ओव्हरलोड झाले :- अलीकडेच टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल वापरण्याचे आवाहन केले, तेव्हापासून सिग्नलवर युजर्स वाढत आहेत. यानंतर सिग्नल अ‍ॅपला बरेच वेरिफिकेशन कोड्स एकत्र पाठवावे लागले की त्याचा सर्व्हर ओव्हरलोड झाला.

सिग्नल अॅपने म्हटले आहे की प्लॅटफॉर्मवर बरेच नवीन वापरकर्ते आल्यामुळे त्यांना वेरिफिकेशन कोड्समध्ये प्रवेश करण्यास वेळ लागत आहे. आता हा प्रॉब्लम दूर केला आहे. आता नवीन वापरकर्ते कोणत्याही समस्याशिवाय त्यांचे खाते तयार करु शकतात.