वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्या झाला इमोशनल, म्हणाला आयुष्यात कधीही …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी निधन झालं. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर केसाळला आहे.

जेव्हा हार्दिक पांड्याच्या मोठ्या भावाला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला.

यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्यानी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांसोबत फोटो शेअर करत तो म्हणाला, ‘तुम्हाला आम्ही गमावलं आहे. ही गो्ष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात.

आज तुमची मुलं जे काही मिळवू शकली आहेत, ते फक्त तुमच्यामुळे.’ तो पुढे म्हणाला, ‘तुम्हाला गर्व होता, पण आम्हाला सर्वांना गर्व आहे की तुम्ही तुमचं जीवन आनंतात घालवलं.

तुमची नेहमी आठवण येईल.’ अशा प्रकारे हार्दिकने वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment