भारतीय संघाच्या विजयचा जल्लोष संगमनेरातही; अजिंक्यच्या गावी आतिषबाजी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे.

या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ऑस्ट्रेलियाला गाबा या मैदानावर पराभूत करणे जवळपास अशक्यच आहे, असा समज होता.

मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने अशक्य ‘शक्य’ करून दाखवले. या विजयामुळे नेतेमंडळी भारतीय संघाचं, संघातील खेळाडूंचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचं कौतुक करत आहेत.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे. शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील त्याचे नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो,

हे अजिंक्य रहाणे यांनी आज जगाला दाखवून दिलं आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. सगळ्या भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी‌ आज आनंदाचा‌ क्षण आहे.

अजिंक्य‌ रहाणेंच्या‌ नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी‌ मालिका जिंकणं आणि इतिहास रचणं हे अभूतपूर्व आहे, असं थोरात म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment