अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

संगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे, असाही दावा सुजय विखेंनी केला. महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत संगमनेरमधून आपल्याला 13 हजार मतांची आघाडी मिळाल्याचंही विखेंनी नमूद केलं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, असे आश्वासनही दिले.
- पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!
- घरात ‘ही’ वनस्पती चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्र सांगतं या वनस्पतीमुळे नशिबावर होतो परिणाम!
- चंदनच नाही तर भारतातील 99% लोकांच्या घरापुढील ‘ही’ 2 झाडे सापांना देतात आयत निमंत्रण !
- रेल्वे तिकीटाने फक्त प्रवासच नाही तर ‘हे’ 5 फायदेही मिळतात; 90% लोकांना माहीत नसतील IRCTC च्या मोफत सुविधा!
- इंटरनेटशिवाय चेक करा PF खात्यातील बॅलन्स; SMS, मिस्ड कॉल आणि WhatsApp ट्रिक जाणून घ्या!