अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरानजिक असलेल्या केडगाव परिसरातील कांबळे मळ्यात बिबट्याचा वावर असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
या प्रकरणी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महानगरपालिका समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले आहे. केडगाव येथील कांबळे मळा पोलिस चौकाजवळील नर्सरीजवळ बिबट्याचा वावर असल्याचे काही नागरिकांनी पाहिले.
याबाबत त्यांनी सभापती मनोज कोतकर यांना माहिती दिली. याची दखल घेत सभापती कोतकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे वन विभागाला माहिती देण्यात आली.
दरम्यान, केडगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथर्डीत गेल्या आठवडापूर्वी बिबट्याने मोठा कहर केला होता.
दोन ते तीन लहान चिमुकल्यांचा जीव बिबट्याने घेतला होता. पाथर्डीतील पाळीव जनावरेही बिबट्याने फस्त केली. पाथर्डीप्रमाणेच श्रीगोंदा,
पारनेर, नगर आदी तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. ही घटना ताजी असतानाच केडगावजवळ बिबट्या आढळून आल्याने नागरिकांची पाचावरण धारण बसली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved