अहमदनगर शहरातील ह्या सिग्नलला चपलांचा हार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-वाहतूक सुरक्षा सप्ताहातही सिग्नल बंद असल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचातर्फे आंदोलन करण्यात आले.

सक्कर चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार घालण्यात आला. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वत: शिडीवर चढून सिग्नलला चपलांचा हार घातला.

त्यावर निषेधाचा फलक लावला. मंचाचे प्रमुख सदस्य यावेळी उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा अभियान सुरू असताना शहरातवाहतुकीचा बोजवारा आहे.

याकडे वाहतूक शाखा, मनापा, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मोठा खर्च करून बसविण्यात आलेली यंत्रणा वापर आणि योग्य नियोजनाअभावी बंद पडली आहे,

तर दुसरीकडे नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वेळी केवळ इव्हेंटबाज सुरक्षा सप्ताह काय कायमाचा, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment