अहमदनगर : मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक १), किशोर जाधव (स्थानिक संस्था कर), प्रविण नेमाणे (सामान्य प्रशासन विभाग), सुधीर सुळ (प्रभाग समिती क्रमांक ४), जितेंद्र सासवडकर (प्रसिद्धी विभाग), संजय चव्हाण (प्रभाग समिती क्रमांक ४), अंकुश कोतकर (प्रभाग समिती क्रमांक ४) यांचा समावेश आहे.
पाणीपुरवठा विभागातील कन्हैय्या छप्पानिया, प्रसिद्धी विभागातील राजाराम मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील नितीन गोरे, प्रभाग समिती क्रमांक १ चे सुनिल खलचे, प्रभाग समिती क्रमांक ४ चे कृष्णा साळवे, दिनेश बारनौक, स्थानिक संस्था करचे राजेश लवांडे, सामान्य प्रशासन विभागातील दत्तात्रय ढवळे, प्रभाग समिती क्रमांक ३ मधील राजेंद्र खडतरे या ९ जणांची नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने पुर्वीच्या विभागातून कार्यमुक्त करत नवीन विभागात रुजू होवून कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम