अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने मनापा उपयुक्त सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहराच्या कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सारडा गल्ली परिसरामध्ये अतिक्रमण करून शेकडो लोकांनी रस्त्यावरच वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.

या अतिक्रणांमुळे बाजारपेठेतून चालणेही अशक्य झाले आहे. महिलांची छेडछाड, मंगळसूत्रांची चोरी, वाहतुकीची कोंडी असे अनेक प्रकार सातत्याने होत आहेत.
महापालिकेने ही अतिक्रमणे कायमची काढण्याची ठोस कारवाई पुढील पाच दिवसांत करावी, अन्यथा हिंदूराष्ट्र सेना तीव्र आंदोलन करत बाजारपेठेतच उपोषणास करेल, असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने मनापा प्रशासनास देण्यात आला.
यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले. दरम्यान शहरातील बाजार पेठेत अतिक्रमण करणारे व्यावसायीक हे सर्व व्यवसाय महापालिकेला एकही रुपयाचा कर न देता राजरोसपणे करत आहेत.
यामुळॆ वाहतूक कोंडी होत आहे, हि समस्या तातडीने दूर करण्यात यावी यासाठी हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved