विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तहसील व उपविभागीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केले.

यासंबंधीचे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले. आपल्या न्याय हक्कासाठी २७ जानेवारीपासून कर्मचारी विविध मार्गांनी आंदोलन करीत आहेत.

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ संघटनेच्या आदेशानुसार दि. २७ रोजी काळ्या फिती लावून, दि. २८ रोजी दुपारच्या सुट्टीमध्ये कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने

व दि. २९ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!