महाविद्यालयसमोर झालेल्या अपघातात एकजण जखमी; शहरातील घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील पत्रकार चौकातील पेमराज सारडा महाविद्यालयासमोर एका भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. दरम्यान या अपघातात राजू हरिभाऊ घोरपडे हे जखमी झाले आहेत.

घोरपडे हे सारस्वत महाविद्यालय (पाईपलाईन रोड) येथे आचारी म्हणून काम करतात. ते मोटारसायकलवरुन जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले. अपघात होवूनही तो वाहनचालक पसार झाला. तोफखाना पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोना. अजय गव्हाणे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment