शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचे गिफ्ट ; शेती कर्जासाठी 16.5 लाख कोटी , देशात राबवणार ‘हे’ अभियान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

त्यांनी कृषी कर्जासाठी अर्थसंकल्पात 16.5 लाख कोटींची तरतूद केली आहे. यासह देशभरात ऑपरेशन ग्रीन योजनेसह स्वामित्व योजना राबविण्याची घोषणा केली. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी पायाभूत सुविधा, डेवेलपमेंट सेस वाढविला आहे.

हे पेट्रोलवर प्रतिलिटर अडीच रुपये तर डिझेलवर चार रुपये प्रतिलिटर ठेवले आहे. याशिवाय, एग्रीकल्चर इफ्रास्ट्रक्चर सेस काबुली हरभऱ्यावर 30%, वाटाण्यावर 50 %, मसूर वर 5 % आणि कापसावर 5 % वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून पाच फिशिंग हार्बर तयार करण्याची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री म्हणाले की सरकारने एमएसपीत उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ केली आहे. ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021 मध्ये गव्हावर शेतकऱ्यांना 75,100 कोटी रुपये देण्यात आले. 43.36 लाख गहू उत्पादकांना एमएसपी अंतर्गत शासकीय खरेदीचा लाभ मिळाला, जो आकडा यापूर्वी 35.57 लाख होता.

अर्थमंत्री म्हणाले, डाळींसाठी शेतकऱ्यांना 10,503 कोटी रुपये देण्यात आले आहेत. धान्याची देय रक्कम 1,72,752 कोटी इतकी आहे. याव्यतिरिक्त, कृषी उत्पादनांच्या निर्यातीत सरकार आणखी 22 उत्पादनांचा समावेश करेल. अर्थमंत्री म्हणाले की कृषी इन्फ्रा फंड 40 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment