अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- करोना काळात कर्तव्य बजावत असताना जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना पोलीस दलात नोकरी देण्यासाठीची प्रक्रिया आठवडाभरामध्ये केली जाईल.
जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्वावर 27 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा पोलीस दलातील मयत झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वारसांना पोलीस दलात संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पोलीस करोना काळात अहोरात्र मेहनत घेत होते. सुरूवातीच्या काळात जिल्ह्यातील पोलिसांना करोनाचे संक्रमण झाले नव्हते.
परंतु, जिल्ह्यात करोना रूग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस दलातही करोनाने शिरकाव केला होता. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना पोलीस दलात स्थान मिळणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved