अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरातील प्रभाग ९ मधील श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द ठरल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १२ मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे. नवी मुंबई, वसई-विरार व कोल्हापूर या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच १६ महानगर पालिकेतील रिक्त २५ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

प्रभाग नऊ मधील श्रीपाद छिंदम अनर्ह ठरवल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. छिंदमने अपक्ष निवडणूक लढवून डिसेबंर २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला होता.
परंतु, आता छिंदमच्या अनर्हतेमुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. १५ जानेवारी २०२१ पर्यंत अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
प्रभागनिहाय प्रारूप यादी १६ फेब्रुवारी, हरकती व सूचनांसाठी ३ मार्चपर्यंत मुदत असणार आहे.मतदान केंद्रांची यादी ८ मार्च तर अंतिम यादी १२ मार्चला प्रिद्ध केली जाणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved