…अन्यथा राज्यभर आंदोलन! या शिक्षक संघटनेचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान आणि २० टक्के अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्यासाठी मुंबई व नागपूर येथे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन सदर शासन निर्णय तात्काळ निर्गमीत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.

अन्यथा शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, सदर मागणीचे निवेदन आमदार गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,

उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान आणि २० टक्के अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित तसेच

अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधीच्या तरतुदीसह अनुदानास पात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे दि.२९ जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने नागपूर येथील संविधान चौकात दि.२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल घेत तातडीने सदर शासन निर्णय निर्गमीत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe