पुतळ्यांचे विटंबन थांबविण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावावे

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबनेचे प्रकार महाराष्ट्रात घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोवर आहेत. त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

महापुरुषांच्या पुतळ्यांपासून नागरिकांना एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. शहरात अनेक ठिकाणी विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. महाराष्ट्रात सध्या काही समाजकंटक समाजात द्वेष पसरविण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करीत आहे.

हे टाळण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यास अशा समाजकंटकांना सहज पकडता येणार आहे. तर अशा प्रकाराला अळा बसणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे,

उपाध्यक्ष तालेवर गोहेर, महासचिव अ‍ॅड. सिद्धार्थ सोळंकी, जिल्हासचिव राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते पवन सेवक, विक्की करोलिया, विक्की वाणे, विनोद दिवटे आदि उपस्थित होते.