शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा या गावातून सुरू झाले.
दरम्यान शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले हि अतिशय दुर्दैवी बाब असून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून कोपरगावला गतवैभव आशुतोष काळेच प्राप्त करून देऊ शकतात.
त्यासाठी २१ तारखेला आशुतोष काळे यांना मोठ्या मतधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांनी कोपरगाव येथे केले. कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चासनळी येथे जाहीर सभेत केली.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदारांच्या भेटी दरम्यान आयोजीत सभेप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरल्या आहेत. ज्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात व देशात होते त्यांच्याकडून तालुक्याच्या जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे ज्या भागात गेलो त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे.
चासनळी व परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर बंधारा २०१६ ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी व विहिरी बंधाऱ्यात वाहून गेल्या होत्या. त्यानंतर यावर्षी आलेल्या महापुरातही हा बंधारा पुन्हा वाहून गेला पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. या मंजूर बंधाऱ्याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम तालुक्याच्या आमदारांकडे आहे.
२०१६ मध्ये या मंजूर बंधाऱ्याची जर चांगल्या प्रकारे दुरुस्ती केलं असती. तर, हा बंधारा पुन्हा वाहून गेलाच नसता पण त्यांनी त्यावेळी या बंधाऱ्याची तात्पुरती डागडुजी केल्यामुळे मंजूर बंधारा पुन्हा वाहून गेला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याला सर्वस्वी तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत.
त्यामुळे आमदारांच्या या कार्यपद्धतीला शेतकरी वैतागला असून अशा कर्तव्यशून्य आमदारांना २१ तारखेला त्यांची जागा दाखवून देऊन २०१४ ला झालेली चूक सुधारून घ्या, असे आवाहन आशुतोष काळे यांनी मतदारांना केले.