नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता.
मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उमेदवाराच्या निश्चित पराभव करेल, असा विश्वास उमेदवार किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
नगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न विशेषत: खासदार यांच्या अखत्यारीत येतो. राज्यात आणि केंद्रात युतीची सत्ता होती. माजी आमदार आणि माजी खासदार या दोघांनी मिळून ताकद लावली असती तर निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकले असते.
परंतु केवळ निवडणुकीपुरते राजकीय तडजोड करणे यातच धन्यता मानणारे या शहराचा काय विकास करणार असा सवाल काळे यांनी केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारच्या मनोमीलनामध्ये सामान्य मतदारांना कोणताही रस नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
वंचितच्या जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत आपणच उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून नगरकरांना विकास काय असतो हे दाखवून देऊ असे काळे यांनी म्हटले आहे.
- टॅक्स ही वाचवा आणि पैसा तिप्पटीने वाढवा! म्युच्युअल फंडाची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत
- Oneplus च्या चाहत्यांसाठी खुशखबर! Oneplus Open फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 41,000 रुपयांनी घसरली, इथं मिळतोय जबरदस्त डिस्काउंट
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल