अहिल्यानगर- मागील भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडके, तलवारी घेऊन १८ जणांच्या टोळक्याने साते ते आठ जणांवर घरात घुसून खुनी हल्ला केला. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी शिशू संगोपन शाळा चितळे रोड, गोवादेव मंदिर शेजारी, दिल्लीगेट नालेगाव येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन दीपक पवार, शिवम दीपक पवार, आदित्य लहू सकट, आदर्श रमेश साळुंखे, हर्षल लक्ष्मण सारसर, अमोल उर्फ भैय्या मोरे, किरण बापू जरे, चेतन रवींद्र निंदाने, राहुल अंबादास रोहकले, आयान शेख, यश प्रदीप पवार (सर्व रा. मुन्सिपल कॉलनी दिल्ली गेट, नालेगाव) प्रशांत प्रदीप दळवी
(रा. वारुळाचा मारुती, नालेगाव), गणेश संतोष भुजबळ (रा. दातरंगे मळा, नालेगाव) अनोळखी पाच ते सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

याबाबत रोहन जयेंद्र चव्हाण (वय २७, रा. मुन्सिपल कॉलनी दिल्ली गेट) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. फिर्यादीत म्हटले की, मागील भांडणाच्या कारणावरून वरील आरोपींनी संगणमत करून लोखंडी रॉड, लाकडी दांडगे व धारदार शस्त्रे घेऊन घरात घुसून कुटुंबीयांवर हल्ला केला. शिवीगाळ दमदाटी करीत बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केला. या मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोटला हे करीत आहेत.