Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संवर्गनिहाय गट ‘क’ व गट ‘ड’ ची एकूण सरळसेवा भरती व पदोन्नतीची १७ हजार २० पदे मंजूर होती. त्यापैकी १५ हजार ६९ पदे भरण्यात आली आहेत. तर अद्यापही १९५१ पदे रिक्त आहेत. यामध्ये गट ‘क’ ची १६४० पदे, तर गट ‘ड’ची ३११ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जुलै २०२५ रोजीची सरळसेवा भरतीची गट क ची १४ हजार २३३ पदे मंजूर होती.
त्यापैकी १३ हजार १२३ पदे सरळ सेवा भरती अंतर्गत भरलेली आहेत. तर अद्यापही १११० पदे रिक्त आहेत. १ जुलै २०२५ रोजी गट क संवर्गातील पदोन्नतीसाठी १८८२ पदे मंजूर होती. त्यापैकी १३५२ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. तर अद्यापही ५३० पदे रिक्त आहेत.

अशी एकूण गट क ची सरळसेवा व पदोन्नतीची १६ हजार ११५ मंजूर होती. यापैकी १४ हजार ४७५ पदे भरण्यात आली आहेत. तर दोन्ही गटातील १६४० पदे अद्यापही रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेतील गट ड ची १ जुलै २०२५ रोजी सरळसेवा भरतीची ८३९ पदे मंजूर होती. यापैकी सरळसेवा भरतीने ५५१ पदे भरण्यात आली असून अद्यापही २८८ पदे रिक्त आहेत. गट ड ची १ जुलै २०२५ रोजी पदोन्नतीची ६६ पदे मंजूर होती. यापैकी ४३ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. तर अद्यापही २३ पदे रिक्त आहेत.
गट क व गट डची सरळसेवा भरतीची १५ हजार ७२ पदे मंजूर होती. यापैकी सरळसेवा भरतीने १३ हजार ६७४ भरण्यात आली असून १३९८ पदे अद्यापही रिक्त आहेत. १ जुलै २०२५ रोजी गट क व गट ड ची १९४८ पदे मंजूर होती. त्यापैकी पदोन्नतीने गट क व ड ची एकूण १३९५ पदे भरण्यात आली.
अद्यापही या दोन्ही गटातील ५५३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळाली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्याचबरोबर जनतेची कामे होण्यास विलंब होत आहे.