अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलामध्ये सध्या सुमारे ३२०० मनुष्यबळ आहे. जिल्ह्यात दरवर्षी २५ ते ३० हजार गुन्हे दाखल होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याने सुमारे ५५० पदांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. तर, नव्याने सात पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनस्तरावर आला असून, नवीन पोलीस ठाणे निर्मिती केली जाणार असल्याचे आश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधान सभा सभागृहात जिल्ह्यातील गुन्हेगारीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सुमारे ३२०० पोलिस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. मात्र, जिल्ह्यात दरवर्षी २५ ते ३० हजार गुन्हे दाखल होतात.

त्यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने सुमारे ५५० पोलिस कर्मचाऱ्यांची पदभरती केली जाणार आहे. तसेच, अहिल्यानगर शहरातील सावेडी, केडगाव, तिसगाव, टाकळी ढोकेश्वर असा सात पोलीस ठाण्याचे प्रस्ताव प्रशासनस्तावर आलेले आहेत. त्यावर लवकरच कार्यवाही करून पोलीस ठाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.