अहिल्यानगर- खून्नस ने का पाहतो असे म्हणत सात जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने हल्ला करीत लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. ही घटना २९ जुलै रोजी बुऱ्हाणनगर येथे रात्री जगदंबा माता मंदिराच्या कमानीजवळ घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सलमान रफिक शेख (रा. कापूरवाडी नगर), कार्तिक अनिल कर्डिले, सिद्धार्थ नवले, गौरव अनिल कर्डिले व रोहन नितीन शिंदे, दत्ता तापकिरे, संदीप निमसे (सर्व रा. बुऱ्हाणनगर) यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत रेहान गालीब खान (वय १८, रा. जगदंबामाता मंदिराच्या पाठीमागे, बुऱ्हाणनगर) याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले की, खून्नने का पाहतो असे म्हणत वरील आरोपींनी दत्ता तापकिरे व संदीप निमसे यांच्या सांगण्यावरून शिवीगाळ दामदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सलमान शेख याने कोयत्याने वार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.