Ahilyanagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी लोकार्पण सोहळ्याचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आ. संग्राम जगताप यांच्याकडे केली.
यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, जलअभियंता परिमल निकम, विजय भांबळ, विलास साठे, विनीत कसबेकर, सुनील क्षेत्रे, संजय जगताप, सुहास शिरसाट, विशाल भिंगारदिवे, विशाल वाकडे, संजय जगताप, पोपट जाधव, लखन सरोदे, मन्या भाऊ अल्हाट, किरण दाभाडे, कौशल गायकवाड, सुदाम सरोदे, भाऊसाहेब साठे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी समितीला सहकार्य करीत येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढला. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पुतळा उभारणी कामाचा लोकार्पण सोहळा दि. २७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली.