अहिल्यानगरमध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावर अन् पोटावर धारदार शस्राने वार करत लुटले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- नवनागापूर येथे डोंगरे कॉम्प्लेक्स, प्राईम मेडिकलजवळून रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाला दोघांनी धारदार शस्त्राने वार करून खिशातील १९०० रुपये हिसकावून घेतले. ही घटना ७ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी ८ जुलै रोजी एमआडीसी पोलिस ठाण्यात आनंद बाबासाहेब खेडकर (रा. गजानन कॉलनी नवनागापूर, ता. जि. अहिल्यापनगर) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ओम बाबासाहेब आरू, अनिष बाळू पवार (रा. गजानन कॉलनी नवनागापूर ता. जि. अहिल्यानगर)
असे संशयित आरोपींची नावे आहेत. आनंद खेडकर यांनी फिर्यादीत म्हटले की, ७ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता डोंगरे कॉम्प्लेक्स येथील प्राईम मेडिकलजवळून पायी जात असतान वरील दोघांनी विनाकारण रस्त्यात अडविले.

रस्त्यात अडवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. बळजबरीने खिशात हात घालून १९०० रुपये काढून घेतले. त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अनिष पवार याने त्याच्या कपरेला खोसलेले धारदार शस्त्र काढून पायावर व पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याचे पाहून ते दोघे पळून गेले. गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!