Ahilyanagar News: राहुरी : आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करुन दगड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तालुक्यातील वावरथ जांभळी येथे नुकतीच ही घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा नामदेव हंडाळ (वय ३२) हे राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे राहत असून ते इलेक्ट्रीक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्याचे काम करतात.
किरकोळ कारणावरून वाद
आण्णा हंडाळ हे २९ जून रोजी बिरा तिखुले यांची इलेक्ट्रीक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी हंडाळ यांची घोडी कप्पी बिघडल्याने काम अधूरे राहिले. ३० जून रोजी आण्णा हंडाळ हे बिरा तिखुले यांच्या शेतात गेले. आणि त्यांना म्हणाले कि, घोडी कप्पी दुरुस्त करण्यासाठी घेऊन जावी लागेल.

जीवे मारण्याची धमकी
त्यावेळी आरोपी म्हणाले कि, तु आमची मोटार बोअरवेलमध्ये सोडायचे काम पुर्ण कर, तरच तुझी घोडीकप्पी येथून घेवून जा, असे म्हणुन आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करुन दगड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तु आमचे मोटारचे पुर्ण काम केल्या शिवाय घोडीकप्पी येथुन घेवून गेला तर तुला जिवे मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
७ जणांविरोधात गुन्हा दाखल
घटनेनंतर आण्णा नामदेव हंडाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी बिरा नाथा तिखुले, धुळा नाथा तिखुळे, किशोर धुळा तिखुळे, दादु बिरा तिखुले तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन महिला (सर्व रा. वावरथ, ता. राहुरी), अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.