अहिल्यानगरमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल २८ लाखांची फसवणूक, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘इनफिनाईट सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि ‘मास्टर सिनर्जी एड्युटेक एलएलपी’ या कथित फायनान्स कंपन्यांनी एकाची २८ लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सीईओ अगस्ती मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा, माकेटिंग डायरेक्टर नवनाथ आवताडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत गिरीश खासेराव जगताप (वय २७, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले की, २०२४ मध्ये मित्रांमधील चर्चेतून आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘ईनफिनाईट बिकन फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. बद्दल माहिती मिळाली. २०२४ मध्ये अहिल्यानगर येथे कंपनीच्या सेमिनारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी वरील लोकांनी कंपनीत गुंतवणूक केल्यास १० ते १२ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले.

त्यानुसार गिरीश जगताप यांनी १५ मार्च २०२५ रोजी ३ लाख रूपये गुंतवले. परंतु, अपेक्षित परतावा मिळाला नाही. वेळोवेळी संपर्क करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फसवणुकीचा उलगडा झाला. जगताप यांच्यासह ऋषिकेश खामकर (५ लाख), तुषार यादव (५ लाख), दिनेश नन्नवरे (५ लाख), मंगेश लोहकरे (५ लाख), विजय गुळवणे (५ लाख) अशा सहा गुंतवणूकदारांनी एकूण २८ लाखांची गुंतवणूक केली आहे. वरील आरोपींनी विश्वास संपादन करून फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!