अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने एलआयसी ऑफिस ते जामखेडकडे जाणाऱ्या आर्मी एरियातील रोडवरील रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक करणारी मोटारकार पकडली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ९९ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २६ जुलै रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरुन, पथकाने एलआयसी ऑफिस ते जामखेडकडे जाणारे आर्मी एरियातील रोडवर चौकात सापळा लावून धनंजय बाबासाहेब बडे (रा. जोगेवाडी ता. पाथर्डी, जि. अ.नगर) संजय दत्तू चौधरी (वय ३८ वर्षे रा. कारखेल ता. आष्टी जि. बीड) यांना त्यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाचे कारसह थांबवले.

पोलिसांनी दोघांची व वाहनाची झडती घेतली असता ४९ हजार ५४० रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांनी या दारूसह ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण ३ लाख ९९ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, पोलीस अंमलदार सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.