एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर सुरू असलेला मावा कारखाना पोलिसांच्या विशेष पोलिस पथकाने केला उद्धवस्त

Published on -

अहिल्यानगर- पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने नवनागापूर, एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला माव्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू, तयार मावा, कच्ची मावा सुपारी व चारचाकी वाहनासह ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम दत्तात्रेय हजारे वय रा. केडगाव ता. जि. अहिल्यानगर, मंजितकुमार विजयकुमार सिंग वय ३८, रा. आरा जि. भोजपूर राज्य बिहार, हल्ली रा. आनंदनगर, नवनागापूर, एमआयडीसी ता. जि. अहिल्यानगर, आकाश बाळासाहेब शिरसाट वय २५ रा. साईराज नगर, नवनागापूर ता. जि. अहिल्यानगर मूळ रा. चांदा ता. नेवासा जि. अहिल्यानगर, प्रशांत अशोक नवथर वय २५ रा. पिंपरी शहाली ता. नेवासा जि. अहिल्यानगर, महेश देविदास खराडे वय २२, रा. जेऊर हैबती ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे विशेष पथक २२ जुलै २०२५ रोजी अहिल्यानगर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यााया हद्दीतपेट्रोलींग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना
त्यांना माहिती मिळाली की, शुभम दत्तात्रेय हजारे हा आनंदनगर, नवनागापूर ता. जि. अहिल्यानगर येथील अमोल सप्रे यांच्या बिल्डिंगच्या छतावर पत्र्याच्या शेडमध्ये सुपारी, चुना पावडर व तंबाखू पासून मशिनवर मावा तयार करीत आहेत.

त्यानुसार पोलिस पथकाने अमोल सप्रे यांच्या बिल्डींगच्या छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये आनंदनगर, नवनागापूर ता. जि. अहिल्यानगर येथे जाऊन छापा घातला सुगंधीत तंबाखू पासून मावा तयार करताना पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्याकडे अधिक विचापूस केली असता सुगंधी तंबाखू, तयार मावा कच्ची मावा सुपारी, चुना पावडर तसेच मावा तयार करण्याची इलेक्ट्रीक मशीन व सुपारी कटींग करायची इलेक्ट्रीक मशीन असा मुद्देमाल शुभम हजारे याचे मालकीचे असून त्याचा माव्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले.

शुभम हजारे यास विश्वासात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्याने तयार मावा हा कारमध्ये ठेवल्याचे सांगितले. छतावरील पत्र्याच्या शेडची व कारची झडती घेतली असता एक लाख ४० हजारांचा १४० किलो तयार मावा, ८६ हजार ४०० रुपयांची ७२ किलो सुगंधीत तंबाखू, ३५ हजारांची ७० किलो कच्ची मावा सुपारी, ८० हजारांचे मावा तयार करण्याचे एक मशिन, ३५ हजारांची सुपारी कटिंग मशिन व पाच लाखांची कार असा ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!