आहल्यानगर- बोल्हेगाव परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा रस्त्यात पाठलाग करून एकाने रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून अश्लिल भाषा वापरत विनयभंग केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या पालकाने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला सकाळी ७ वाजता जाते व कॉलेज संपल्यानंतर दुपारी १२ वाजता घरी येते. दरम्यान, सोमवारी (१४ जुलै) दुपारी कॉलेज संपल्यानंतर फिर्यादीची मुलगी बोल्हेगाव परिसरातील एका रस्त्यावरून घरी जात असताना एक अनोळखी तरूण त्याच्याकडील दुचाकीवरून आला.

त्यान दुचाकी तिच्या समोर आडवी लावली व खाली उतरून तिचा हात पकडत तू मला आवडतेस असे म्हणत तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने घाबरत त्याचे नाव विचारल्यावर त्याने स्वतःचे नाव सूरज विद (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बोल्हेगाव) असल्याचे सांगितले. ती त्याजागेवरून निघून गेल्यावरही तो तिचा पाठलाग करू लागला.
त्याला विरोध केल्यावरही तो तिच्यावर दबाव टाकत मी विचारलेला प्रश्नाचे उत्तर दे असे म्हणत त्रास देत राहिला. ही घटना पीडित विद्यार्थिनीने घरी सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.