Ahilyanagar News : दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, मोटारसायकलीचे नुकसान तर चार गंभीर जखमी

Updated on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गटात गुरूवारी दि. २४ दुपारी तुंबळ हाणामारी झाली. त्यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्हती.

दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटात चांगलीच हाणामारी झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दोन्ही स्थानिक असल्याने काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.

हाणामारीची घटना समजताच तोफखाना पोलस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम
दळवी व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जमावाला पांगून परिस्थिती आटोक्यात आणली. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दोन्ही गटाच्या हाणामारीत दुचाकींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!