राहुरी- अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील एका परिसरात नुकतीच ही घटना घडली.
या प्रकरणी आरोपी तरुणावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह एका शिवारातील एका गावात राहते. ६ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान पीडित मुलगी व घरातील इतर लोक घरात झोपलेले असताना आरोपी त्यांच्या घरात घुसला. त्याने पीडित तरुणीला मिठी मारून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

तेव्हा पीडिता मुलीच्या आजीला जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा करून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडीलांनी आरोपीला तु आमच्या घरात येऊन आमच्या मुलीची छेडछाड का केली, अशी विचारणा केल्याचा आरोपीला राग आल्याने त्याने पीडित मुलीचे आई, वडील व मामांना शिवीगाळ केली. तसेच तुम्ही माझ्याविरुद्ध पोलीस
स्टेशनला कितीही तक्रारी केल्या तरी तुमच्या मुलीशी मी लग्न करीन व तुम्हाला एका एकाला संपून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
सदर घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सार्थक अण्णासाहेब वांदेकर याच्यावर मारहाण, विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.