विमान तिकीट एजन्सीच्या नावाखाली आहिल्यानगरच्या तरूणीची केली तब्बल ३० लाखांची फसवणूक, पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- विमान व हॉटेल तिकीट बुकिंग एजन्सी देण्याच्या नावाखाली कमिशनचे आमिष दाखवून तरुणीची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

राहुल दर्शन जगताप, पत्नी एंजेल राहुल जगताप (दोघेही रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत आंचल पवनकुमार अग्रवाल (वय २४, रा. तांबटकर मळा, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या कुटुंबासाठी विमान तिकीट बुक करताना अनुज मित्तल यांच्याकडून ‘रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायजेशन’ या नवी मुंबईस्थित कंपनीबाबत माहिती मिळाली.

ही कंपनी हॉटेल व फ्लाईट बुकिंग व्यवसायासाठी एजंट शोधत असल्याचे सांगण्यात आले. अनुज मित्तल यांनी फिर्यादीची २७ऑगस्ट २०२४ रोजी अहिल्यानगर येथे राहुल जगताप व त्याची पत्नी एंजेल जगताप यांच्याशी भेट घडवून दिली. त्यांनी व्यवसायात १५ टक्के कमिशनच्या अटीवर एजन्सी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यासाठी ३० लाख रुपये प्रारंभिक ठेव म्हणून मागितली.

फिर्यादी यांनी १० सप्टेंबर २०२४ रोजी येस बँकेमधून दोन व्यवहारांव्दारे एकूण ३० लाख रूपये सुशिला जगताप यांच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर, राहुल व एंजेल यांनी विविध कारणे देत एग्रीमेंट पुढे ढकलले. काही दिवसांनी त्यांनी फिर्यादीचे कॉल घेणे थांबवले. एजन्सी देण्याचे आमिष दाखवून, १५ टक्के कमिशन मिळेल या नावाखाली एकूण ३० लाख रूपये उकळले गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!