लग्नासाठी नकार दिल्याने तरूणीला बळजबरीने गाडीत बसवलं, आळंदीला नेऊन खोलीत डांबलं अन् बलात्कार केला, शेवगाव पोलिसांत ५ जणांवर गुन्हा दाखल

Published on -

शेवगाव- एका १९ तरुणीस बळजबरीने लग्न लावून देण्यासाठी चारचाकी वाहनामध्ये बसवून नेले. लग्नासाठी नकार दिल्याने तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात कलम ६४,१२७(२), ८७,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहन चालक (तिघे रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव), सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे (रा. आळंदी, पुणे), अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपी महिला ही एक आध्यात्मिक क्षेत्रातील आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, १९ वर्षीय फिर्यादी मुलीस गुरुवार (दि. ३) रोजी वरखेड, ता. शेवगाव येथून अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे यांच्यासह वाहन चालक यांनी लग्न लावून देण्यासाठी बळजबरीने काळ्या रंगाच्या ईरटीका (गाडी नंबर एम. एच.४३ सी.सी ७८१२) गाडीमध्ये बसविले. त्यानंतर आरोपींनी दमदाटी करून आळंदी पुणे येथे नेले.

तेथे लग्नाला नकार दिल्याने आरोपींनी एका खोलीत डांबून ठेवले. तेथे बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला, असे पीडित मुलीने म्हटले आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास विशाल लहाने हे करीत आहेत. पुढील

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!