टोमॅटोपाठोपाठ डाळिंब १४ तर संत्रा १२ हजार ; कांदा मात्र गडगडलेलाच अहिल्यानगर बाजार समितीत ४३४ क्विंटल फळांची आवक

Published on -

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांच्या भावात वाढ झाली असून संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
एकीकडे सध्या फळांना चांगले भाव मिळत असताना दुसरीकडे कांद्याला मात्र कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ६३ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ४७ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सीताफळाची १० क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळाला २ हजार ५०० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची २४ क्विंटलवर आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

संत्र्याची १६ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला २ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची ६ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १४ हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अननसाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १५५ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १ हजार ते ५००० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची ३ क्विंटल आवक झाली होती. तोेतापुरी आंब्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला.

निलम आंब्याची १ क्विंटल आवक झाली होती. निलम आंब्यांना ३००० ते ३५०० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ७८ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला १००० ते ९ हजार रुपये भाव मिळाला. केळीची १० क्विंटलवर आवक झाली होती.

केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. खजुराची २ क्विंटल आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ५५०० रुपये भाव मिळाला. पिअरची १ क्विंटल आवक झाली होती. पिअरला ८००० ते १२ हजार रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची १ क्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!