Ahilyanagar News : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकाला भरदिवसा कारमध्ये उचलून नेत लुटले

Published on -

व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी गाडी आडवी लावून बळजबरीने त्या कार मध्ये बसवून निर्जनस्थळी नेवून त्याच्या फोन पे मधून १ लाख ४० हजार आणि खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील साईबन रोड वर घडली. या प्रकरणी चौघाजणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील
एका आरोपीला पोलिसांनी २३ जुलै रोजी अटक केली आहे.

याबाबत सुरेश सखाहारी म्हसे (वय ४३, रा. डेअरी चौक, शेंडी बायपास पाण्याची टाकी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा शिलाई मशीनचा व्यवसाय असून ते ६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता साईबन रोडने जात असताना त्यांना स्वप्नील व्यंकटेश मेहेत्रे, हर्षद गौतम गायकवाड, विश्वजीत वसंत माने (तिघे रा. वडगावगुप्ता, अ.नगर) व वैभव गौतम गायकवाड यांनी रोडवर चारचाकी गाडी आडवी लावुन, आडवुन त्यांना बळजबरीने गाडीत बसवुन पुढे निर्जन स्थळी नेले.

त्यानंतर फिर्यादीच्या ओप्पो कंपनीचे मोबाईल मधुन फोन पे वरुन १ लाख ४० हजार रुपये फिर्यादीकडुन बळजबरीने स्वप्नील मेहेत्रे याचे फोन पे अकाउंटवर ट्रान्सफर करुन घेतले. तसेच फिर्यादीच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेऊन तू जर या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारुन टाकू असा दम दिला. तसेच तिघांनी मिळून फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण करुन गाडीचे खाली ढकलुन दिले. या मारहाणीत फिर्यादी हे जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरेश म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!