अहिल्यानगर- चास ता. अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या सर्व नियामक संस्थेकडून मान्यता मिळाली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध आडसूळ यांनी दिली.
चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांचे स्वप्न होते की, शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बी. आर्किटेक्चर हे पाच वर्षाचे शिक्षण आडसूळ कॅम्पसमध्ये मिळाले पाहिजे, या हेतूने आडसूळ आर्किटेक्चर कॉलेजने प्रस्ताव शासनाला सादर केला होता. आता आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास शासन मान्यता मिळाली.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ प्रवेशासाठी डी. टी. ई. कोड ५६७३ आहे, तरी सर्व शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी आडसूळ आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन अनिरुद्ध आडसूळ यांनी केले.
या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी संस्थेच्या सेक्रेटरी डॉ. लीनाताई आडसूळ, खजिनदार परमेश्वर आडसूळ, संचालक कृष्णा आडसूळ, आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप एम पाटील, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्राचार्य व डायरेक्टर डॉ. संभाजी पठारे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, डॉ. संदेश वायाळ, आर्ट्स कॉमर्सचे प्राचार्य डॉ. प्रदीप पंडित, आडसूळ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. रियाज बेग, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्र. रमेश गडाख कार्यालयीन अधीक्षक सय्यद जमीर व रमेश नेटके यांचे सहकार्य लाभले.