Ahilyanagar News : नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोतियानी यास अटक करत केली कोठडीत रवानगी

Published on -

अहिल्यानगर- नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला काल अटक केली. आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँकेचा तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, प्रवीण सुरेश लहारे याने ३ कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी याच्या खात्यात वर्ग केल्याचे व त्यातून जागा खरेदी झाल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात मोतीयानी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्याने तो न्यायालयासमोर हजर झाला होता. न्यायालयाने त्याला येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले.

मनोज मोतीयानी यांनी व्यावसायासाठी गणेश ट्रेडर्स फर्मवर ९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज खात्यातून मोठ्या रक्कम इतर कर्जदारांच्या खात्यावर वर्ग केल्या. त्याबाबत विचारणा केली असता आरोपी उडवाडवीची उत्तरे देत असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकारी गणेश उगले यांनी केली. न्यायालयाने आरोपी मनोज मोतीयानी याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!