Ahilyanagar News : नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत पडली पार, ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी राखीव

Published on -

वाळकी- नगर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सामाजिक आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.२३ जुलै) दुपारी तहसीलदार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात काढण्यात आली. नंतर त्यातील प्रवर्गनिहाय महिला राखीव ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

या सोडतीत १०५ पैकी ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले आहे, त्यामुळे या गावांत महिला राज येणार आहे. नगर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी दरेवाडी, वडगाव गुप्ता, राळेगण, नेप्ती या मोजक्या ग्रामपंचायती सर्वसाधारण व्यक्तींसाठी खुल्या राहिल्या आहेत.

इतर बहुतांश ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण- अनुसूचित जाती स्त्री राखीव (८ ग्रामपंचायती) भोयरे खुर्द, पारेवाडी (पारगाव), सांडवे, मांडवे, कामरगाव, अकोळनेर जाधववाडी, भोरवाडी, पांगरमल. अनुसूचित जाती व्यक्ती (७ ग्रामपंचायती) हिवरेबाजार, चिचोंडी पाटील, टाकळी खातगाव, सारोळा कासार, वारुळवाडी, आठवड, धनगरवाडी. अनुसूचित जमाती स्त्री राखीव (३ ग्रामपंचायती) बुरुडगाव, जेऊर, खातगाव टाकळी. अनुसूचित जमाती व्यक्ती (२ ग्रामपंचायती) पिंपळगाव माळवी, देहरे.

ना.मा.प्र स्त्री राखीव (१४ ग्रामपंचायती) इमामपुर, शहापूर केकती, शिराढोण, हातवळण, मठपिंप्री, अरणगाव, हमीदपूर, पारगाव मौला, पिंप्री घुमट, वाळुंज, खडकी, उदरमल, निंबळक, नागरदेवळे. ना.मा. प्र व्यक्ती (१४ ग्रामपंचायती) रांजणी, रुईछत्तीसी, गुंडेगाव, इसळक, मांजरसुंबा, बहिरवाडी, पिंपळगाव कौडा, मेहेकरी, देऊळगाव सिध्दी, नारायणडोहो, डोंगरगण, हिंगणगाव, ससेवाडी. सर्वसाधारण स्त्री राखीव (२९ ग्रामपंचायती) शिंगवे व इस्लामपूर, विळद, पोखर्डी, बुऱ्हाणनगर, जखणगाव, सोनेवाडी (चास), चास, दशमी गव्हाण, सोनेवाडी (पिं.ला.), खांडके, माथणी व बाळेवाडी, वाळकी, नवनागापूर, घोसपुरी, टाकळी काझी, मदडगाव, हिवरेझरे, साकत खुर्द, वडगाव तांदळी, गुणवडी, वाटेफळ, तांदळी वडगाव, आंबीलवाडी, खोसपुरी, खारे कर्जुने, खंडाळा, कोल्हेवाडी, भोयरे पठार, मजले चिंचोली.

सर्वसाधारण व्यक्ती (२८ ग्रामपंचायती)- निमगाव घाणा, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, कापूरवाडी, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, दरेवाडी, वाकोडी, निंबोडी, वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी पारगाव, कौडगाव व जांब, पिंपळगाव लांडगा, बाबुर्डी घुमट, आगडगाव, रतडगाव, देवगाव, वडगाव गुप्ता, बाबुर्डी बेंद, उक्कडगाव, दहीगाव, राळेगण, नेप्ती, सारोळा बद्धी, बारदरी, पारगाव भातोडी, आव्हाडवाडी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!