अहिल्यानगर : आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ देविदास अवलेलु आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (दि.३१ जुलै) सेवानिवृत्त झाले. मोईन शेख यांनी ३७ वर्षांच्या सेवा कार्यकाळात राजकोट, अहिल्यानगर, शिर्डी, सटाणा, संगमनेर याठिकाणी दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रात आपली सेवा बजावली. शिर्डी येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
देवीदास अवलेलु यांनी आपल्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात उत्कृष्ट सेवा बजावली. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या स्थापने पासूनचे ते साक्षीदार आहेत. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आज (दि.३१) दोघांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला.

यावेळी आकाशवाणीच्या सहायक निदेशक अभियांत्रिकी मानसी गारुडकर, मिलींद पारनाईक, कार्यक्रम विभागाचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे, जयंत लाटे, पांडुरंग जोशी, अभियांत्रिकी विभागाचे गजेंद्र पवार, संदीप अहिरराव, महेंद्र रोहोकले, संतोष साबळे, रावसाहेब देशमाने, मनोहर कोंडार आदींसह सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.