अहिल्यानगर- भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बस गाड्यांना भिंगारमध्ये थांबा देण्याचे आदेश विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच भिंगार येथील बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे लेखी पत्र अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकारी यांनी भिंगार भाजापाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांना दिले आहे.
भाजपाच्या भिंगार मंडलाच्या पाठपुराव्यास यश आले असून सर्व एसटी गाड्या आता भिंगार स्थानकात थांबत आहेत. भिंगार भाजप मंडलाच्या वतीने भिंगार शहरातून जाणाऱ्या एसटी बस गाड्या भिंगारमध्ये थांबात नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदन काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन राज्य परिवहन विभाग नियंत्रक अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

याबाबत भिंगार भाजपाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांनी विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांचे आभार मानले असून भिंगार बसस्थानकाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर काम हाती घेऊन प्रवाश्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे.