Snake Viral News : पावसाळा सुरु झाला की सगळीकडे आल्हाद दायक वातावरण तयार होते. पण याच काळात काही धोके पण वाढतात. पावसाळ्यात प्रामुख्याने सापांचा धोका असतो. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. देशात सापांच्या काही निवडक जाती विषारी आहेत. पण आपल्याकडे सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. विषारी सापांच्या दंशामुळे काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे घराजवळ स्वच्छता राखणे, तसेच साप घराजवळ येऊ नये यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण अशाच काही महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती पाहणार आहोत.
तुम्ही दालचिनी, लवंग, व्हिनेगर, मॉथबॉल्स, लसूण, तुळस असे पदार्थ घरात ठेवले पाहिजेत. याच्या तीव्र वासांमुळे साप लांब पळत असतात. त्यामुळे या गोष्टी घरात असल्यास याचा धोका बऱ्यापैकी कमी होतो. तसेच घरात साप शिरल्यास घाबरून न जाता शांत डोक्याने काम घ्यावे. अशावेळी घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्राची मदत घ्यावी. परंतु तोपर्यंत वेळ नसेल, तर सुरक्षित अंतर ठेवून सापावर रॉकेल टाकल्यास तो तत्काळ घरातून निघून जातो. निसर्गात काही झाडे असे आहेत जे सापांना दूर ठेवतात.

सर्पगंधा, पुदिना, लेमन ग्रास, लैव्हेंडर आणि कॅक्टस यांचा यात समावेश होतो. ही झाडे लावल्यास साप घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरणार नाहीत. या झाडांचा तीव्र वास, काटेरी पानं व नैसर्गिक गुणधर्म सापांना नकोसे वाटतात. तसेच लेमन ग्रास व लसणाच्या पानांचा अर्क किंवा तेल शिंपडल्यासही साप दूर राहतात. या उपाययोजनांमुळे सापांचा धोका कमी होऊ शकतो. मात्र सर्पमित्र साप दिसला की सर्वप्रथम वनविभागातील अधिकाऱ्यांना किंवा सर्पमित्रांना पाचारण करायला हवे असा सल्ला देतात.