ट्रेन तिकीट बुक करताय? मग ‘हे’ एक काम केलंत तर 100% कन्फर्म सीट मिळणार! बघा गुपित फंडा

Published on -

Train Ticket Booking Tips:- भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. रेल्वे प्रवास हा आरामदायी, परवडणारा आणि सुरक्षित असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचा तो पहिला पर्याय असतो. मात्र, ट्रेनने प्रवास करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे कन्फर्म तिकीट मिळवणे. अनेकदा तिकिटे वेटिंगमध्ये अडकतात आणि प्रवासाचा संपूर्ण प्लॅन बिघडतो. पण जर तुम्हाला हा त्रास टाळायचा असेल आणि प्रत्येक वेळी कन्फर्म ट्रेन तिकीट हवे असेल, तर त्यासाठी एक सोपी पण अत्यंत उपयोगी ट्रिक आहे व ती म्हणजे ‘मास्टर लिस्ट’ तयार करणे.

कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी काय करावे?

IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपवर ट्रेन तिकीट बुक करताना आपण प्रत्येक वेळेस प्रवाशाचे नाव, वय, लिंग आणि इतर माहिती पुन्हा-पुन्हा भरतो. यात बराच वेळ जातो आणि तोच काही सेकंदांचा वेळ तुमचं तिकीट कन्फर्म किंवा वेटिंग ठरवतो.हे टाळण्यासाठी IRCTC ने एक सोय दिली आहे व ती म्हणजे ‘Master List’ (मास्टर लिस्ट) होय.
ही एक अशी यादी असते, ज्यात तुम्ही आधीच तुमचे आणि तुमच्या सहप्रवाशांचे सर्व तपशील भरून ठेवता. त्यामुळे तिकीट बुक करताना फक्त नाव निवडा आणि बुकिंग करा. यात वेळ वाचेल आणि तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढेल.

मास्टर लिस्ट कशी तयार करायची?

1-Step 1: IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर लॉगिन करा–सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट उघडा किंवा त्याचे मोबाइल अॅप डाउनलोड करा.यानंतर ‘Login’ वर क्लिक करून तुमचे खाते उघडा.

2-Step 2: ‘My Account’ मध्ये जा–लॉगिन झाल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या ‘My Account’ या विभागावर क्लिक करा.त्यानंतर ‘My Profile’ पर्याय निवडा.

3-Step 3: ‘Add/Modify Master List’ निवडा.आता येथे तुम्हाला ‘Add/Modify Master List’ हा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक करून प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, लिंग, आणि इतर माहिती भरा.

4-Step 4: आधार पडताळणी करा- आधार क्रमांक टाका आणि ‘Submit’ करा. काही क्षणांत IRCTC तुमची माहिती पडताळेल आणि ती मास्टर लिस्टमध्ये जतन म्हणजेच सेव्ह केली जाईल.

याचा फायदा काय होईल?

पुढच्यावेळी तिकीट बुक करताना तुम्हाला पुन्हा तपशील टाकण्याची गरज नाही.फक्त प्रवाशाचे नाव मास्टर लिस्टमधून निवडा आणि बुकिंग पूर्ण करा.वेळ वाचल्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा आधी बुकिंग करू शकाल.
यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

जलद पेमेंटचा पर्याय वापरा

तिकीट बुकिंगदरम्यान पेमेंट करण्यासाठीही वेळ जातो. त्यासाठी IRCTC Wallet वापरणे फायदेशीर ठरेल. तुम्ही QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकता.
पेमेंट जितके जलद, तितका कन्फर्म सीट मिळण्याचा चान्स जास्त असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe