शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच अभियंत्यानी केली सीना नदीच्या पुलाची पाहणी, काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नका शिवसेनेची मागणी

अहिल्यानगरच्या सीना नदीवरील पुलाचे काम रखडल्याने शिवसेनेने ठेकेदारावर कारवाई व बिल अडवण्याची मागणी केली. आंदोलनाच्या इशारानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते पाहणीसाठी हजर झाले. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- मागील आठवड्यामध्ये अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालून करण्यात आली होती. त्यानंतर आज पुणे येथून राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांनी शहरात सुरू असलेल्या सीना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.

ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हे काम पूर्ण होण्यास उशीर होत असल्याने ठेकेदारावरही दंडात्मक कारवाई केली. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये हे काम पूर्ण केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संभाव्य पुराचा धोका ओळखून या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी ठेवणार आहे. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास कर्मचाऱ्यांना बॅरिकेट करण्याची व्यवस्थाही करण्यास सांगितली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

संबंधित ठेकेदाराने या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, हा रस्ता नागरिकांना येण्या जाण्यासाठी खुला करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, माजी सभापती गणेश कवडे, माजी गटनेते संजय शेंडगे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, संदीप दातरंगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News