पाथर्डी- एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्चा खाली करा. आम्ही मागतो हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशी जोरदार घोषणाबाजी करीत तालुक्यातील आयटक संघटनेच्या वतीने आशा स्वयंसेविकांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी तुमच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतो, असे आश्वासन दिले.
आयटक आशा स्वयंसेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा मनीषा डांभे, सुवर्णा मरकड, सरला आमटे, भारती पालवे, मंगल फुंदे, कावेरी पंडित, अलका रुपनर, सुनीता राजळे, वैशाली शेळके, वनिता गर्जे, सविता दानवे, व्दारका पाठक, मनिषा शिंदे, अलका केंळगंद्रे, शांता कोकणे, संगीता सावंत, निलप्रभा फुंदे, गजाला शेख, पद्मा खंडागळे, सविता पाठक, मंगल पाखरे, सविता डमाळे, जयश्री खेडकर, वैशाली खेडकर, सुवर्णा खेडकर, रत्नमाला वाघमारे, सुनिता शेळके, नंदा टाकसाळे, लालवंती जवरे, शोभा बर्डे, अनिता कांबळे, आशा खेडकर यांच्यासह तालुक्यातील आशा स्वंयसेविका उपस्थित होत्या.

येथील स्व. वंसतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा गेला. तेथे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना आयटक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या निवेदन देण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी राणू घुगे, चारुदत्त पालवे, प्रतिमा भागवत, सत्यप्रकाश दहिफळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आशा स्वंयसेविकाचे सहा महिन्यांचे मानधन थकलेले होते. आजा मोर्चा आहे म्हणून काल मानधन दिले गेले. महिन्याला मानधन मिळाले पाहिजे. आता मानधनाऐवजी वेतन दिले जावे. दहा लाखांचा विमा मिळावा. ऑनलाईनचे काम सक्तीचे नको. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आशांना मदत केली पाहिजे. आम्ही काम करतो आणि त्यावर वरिष्ठांना अहवाल देऊन लाखो रुपयांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळतो. आम्हाला सहा महिने पगार मिळत नाही. काम करूनही मोबदला मिळत नाही. आशांच्या विविध मागण्या मान्य केल्या जाव्यात.
– मनीषा डांभे, तालुकाध्यक्षा, आयटक आशा स्वयंसेविका संघटना, पाथर्डी.