अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांचा भाव तर पपईला ४ हजार रुपये भाव

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची ४८५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांना ८ हजार रुपयांपर्यंत, तर पपईला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची १९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची २७ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला २००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची २३ क्विंटलवर आवक झाली होती.

सीताफळाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची ३० क्विंटलवर आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची २० क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला २ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सफरचंदाची २२ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अननसाची ६ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १४३ क्विंटल आवक झाली होती.

पेरूला प्रतिक्विंटल १ हजार ते ४००० रुपये भाव मिळाला. निलम आंब्याची १४ क्विंटल आवक झाली होती. निलम आंब्यांना २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ८८ क्विंटल आवक झाली होती.

ड्रॅगन फूटला १० हजार रुपयांपर्यंत भाव

ड्रॅगन फ्रूटला २००० ते १० हजार रुपये भाव मिळाला. केळीची १७ क्विंटलवर आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला. खजुराची १० क्विंटल आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये भाव मिळाला. पिअरची १ क्विंटल आवक झाली होती. पिअरला ८००० ते १३ हजार रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!