तळीरामांसाठी बॅड न्युज ; विदेशी दारूच्या किंमतीत सरासरी १५० रूपयांची घसघशीत वाढ

Published on -

अहिल्यानगर : तळीरामांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या दरात १ जुलै २०२५ पासून मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने मध्यमवर्गीय मद्यपींचा हिरमोड झाला आहे. विदेशी दारूच्या किंमतीत सरासरी ८० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे दारूची किंमत वाढल्याने अनेक दारू विक्रेत्यांकडे ग्राहक मंदावल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. विदेशी दारूच्या तुलनेत देशी दारूच्या किमतीत कमी वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने एक जुलैपासून विदेशी दारूच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात कर गोळा होणार आहे.तर दुसरीकडे दारू पिणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्य सरकारने विदेशी दारूच्या किंमतीत वाढ केली असली तरी अद्यापि, काही विक्रेत्यांकडे जुनी दारू शिल्लक असल्याने ते चढ्या दराने विक्रीत करीत असल्याने त्यांना चांगला नफा मिळत आहे. दारूच्या किमती वाढल्या असल्या तरी मद्यपींची संख्या ही कुठेही कमी झाल्याची दिसत नाही. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त खपणाऱ्या ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे आर. एस., मॅकडॉल या कंपनीचे विदेशी दारू सर्वांत जास्त विक्री होते.

सरकारने नेमक्या अशाच दारूच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय मद्यपींची आबळ सुरू झाली आहे. साधारण १८० मिलीची बॉटल ११० रुपयांना मिळत होती. तीच बॉटल आता २२० रुपयाला खरेदी करावी लागत आहे. त्यात शहरी व ग्रामीण भागात काहीप्रमाणात बदल आहे. त्यामुळे मद्यपींच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. तर, विनाधारक दारू विक्रेत्यांच्या दुकानात मद्यपींची संख्या मंदावली आहे. दररोज दारू सेवन करणारे आता दिवसाआड दारू घेऊन लागले तर, दररोज दोन बॉटल घेणारे आता एकाच बॉटलवर आले. त्यामुळे त्याचा मद्य विक्रीवरही परिणाम होऊ लागल्याने विक्रेते चिंतातूर झाले आहेत.

विदेशी दारू पूर्वीची किमत सध्याची किंमत

मॅकडॉल व्हिस्की १६० २२०
मॅकडॉल रम १३५ २०५

रॉयल स्टॅक २०० २५०
गोवा जिन १०० १७५

आयबी १६० २२०
८पीएम १२० २००

ओल्डमन १४५ २१५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!