शासनाच्या विविध योजनांचे रखडलेले अनुदान लवकरच लाभार्थ्यांना मिळणार, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

Published on -

नेवासा-विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही लाभार्थ्यांचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते थांबले आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजन केले आहे.

तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या विशेष सहाय्य योजनेंतर्गत अनुदान वंचित लाभार्थ्यांसाठी उद्या २५ जुलै २०२५ रोजी नेवासा तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर योजनांमध्ये आधार डेबिट प्रणालीतून थेट अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी तांत्रिक त्रुटींमुळे गेल्या सहा महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळणे थांबले होते. आधार क्रमांक जुळत नसणे, नावातील चूक, बायोमेट्रिक त्रुटी, हयातीचे दाखले यांसारख्या अडचणींमुळे ही प्रकरणे रखडली होती.

या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून आ. विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात राज्याचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरच जिल्हा प्रशासनाला विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आधार या शिबिरात लाभार्थ्यांची कार्डशी संलग्नता आणि नाव दुरुस्ती, बायोमेट्रिक प्रमाणीकरण हयातीचा दाखला व इतर तांत्रिक पूर्तता केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह ठरलेल्या दिवशी तहसील कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!